होली फॅमिली स्कूल गडचांदूर मध्ये योग दिवस साजरा
जागतिक योग दिन विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाने साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यामध्ये योग योगासने योगसाधना यांना अनन्य साधारण महत्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी साधुसंत यांनी वेळेवेळी योगाचे महत्त्व त्यांचे फायदे आणि त्यांची गरज पटवून दिलेली आहे आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाचा माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो, शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो तन मन यांच्या एकत्रित व्यायाम म्हणजे योग आणि हा योग दिन 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे ठरवण्यात आले आणि त्याच दिवसाचे अवचित साधून शाळेमध्ये अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती या नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका शारीरिक शिक्षक प्रीतम चौधरी आणि आणि शिक्षिका जुही शेख यांनी केले होते. योग बल साधने वर आधारित विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करण्यासाठी आलेले तसेच सर्व शिक्षक वृंदांनी सुद्धा योगासने करण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शाळेच्या लोकल मॅनेजर सिस्टर नवीन बास्टीन व शाळेच्या प्राचार्या सिस्टर दीपा यांनी कार्यक्रमाचे औचित्य साधून आजच्या धकाधकीच्या जीवनात योग साधनेचे महत्त्व पटवून दिले व आपले मत व्यक्त केले याप्रसंगी शाळेच्या उपप्राचार्य सिस्टर ब्लेसि मारिया व शाळेतील वरिष्ठ शिक्षिका शैलेजा नायर, सिस्टर दीप्ती,सपना सेलोकर,सविता रणदिवे, सतीश भगत व आरती सातपुते व इतर शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्यार्थीनी वैभवी शेळके हिने केले व राष्ट्रागीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.