ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव येथे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत आगळंवेगळं रक्षाबंधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 विधान परिषदेचे शिक्षक आमदार सुधाकर अडवले हे कोरपना येथील कार्यक्रमासाठी दौऱ्यावर होते दौरा आटोपवून त्यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव केंद्र सोनुर्ली पंचायत समिती कोरपना या शाळेला सदिच्छा भेट दिली व या भेटीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या ची प्रदर्शनी बघितली तसेच त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मग विद्यार्थ्यांनी आमदार साहेबांना राखी बांधण्याचे ठरवलं साहेबांनीही त्या राखीचा प्रेमपूर्वक स्वीकार केला.

या राख्या विद्यार्थी भारतीय सैनिकांना सीमेवर व चंद्रपुरातील संपूर्ण पोलीस दलाला पाठवीत असल्याबद्दल सांगितले त्यावेळी त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले सदर उपक्रमाचे नियोजन हे काकासाहेब नागरे सहाय्यक शिक्षक यांनी केले त्याबद्दल त्यांचे देखील साहेबांनी कौतुक केले यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार उच्च श्रेणी मुख्याध्यापक सखाराम परचाके यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी यांचा सत्कार वसंत गोरे पदवीधर शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अमरावतीचे मुख्य अतिथी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक काठोळे सर हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी माने सर पुष्पा इरपाते अनिल राठोड नितीन जुलमे शालेय मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री यश ब्रह्मकिशोर पिंपळकर लोकेश्वरी भोंगळे कांचन गाढवे, काजल निंदेकर वेदिका ढवळे सुहानी येवले स्वाती उरकुडे व सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब नागरे यांनी केले तर आभार नितीन जुलमे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये