ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुऱ्हे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मांगलहिरा जंगलात थिप्पा येथील गुऱ्हे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा मृत्यू झालाची घटना घडली असून थिप्पा येथील झाडू लेतू कोडापे वय साठ वर्षे हा गावातील जनावरे चारण्यासाठी दिनांक १८ नेहमी प्रमाणे जंगलात गेला असता दिवसभर जनावरे चारत असतना सायंकाळी जनावरे गावात परत आले मात्र गुराखी हा परत आला नाही. तेव्हा गुराखा चे नातेवाईक व गावकरी जंगलात त्याला शोधण्यासाठी गेले मात्र रात्री तो मिळाला नाही. परत दुसऱ्या दिवशी १९ सकाळी ८ वाजताच्या दरम्यान मांगलंहिरा जंगलात मृतदेह सापडला.

  पोलीस पाटील जुगादराव कोरांगे यांनी घटनेची माहिती पोलीस स्टेशन कोरपणा येथे देण्यात आली ठाणेदार गाडे यांच्या मार्गदशनात देवानंद केकण पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर जाधव पोह किशोर रिंगोले पोशी पथक रवाना झाले घटना स्थळ गाढून घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरतपासनी साठी ग्रामीण रुग्णालंय कोरपणा येथे आणले. शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला झाडू लेतू कोडापे याचा मृत्यू सरपदंशाने झाला असल्याचे बोलले जात आहे.

सदर कुटुंबंाची परिस्थिती हालाकीची असल्याने कुटुंबंयाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे घटनेचा पुढील तपास कोरपणा पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये