रेती मुरूम उपसा करिता बांधलेला कुसळ येथील पाईप रपटा गेला वाहून
जीआरआय एल इन्फ्रा कंपनीचे निकृष्ट बांधकामाचे उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
‘राष्ट्रीय महामार्ग 353 बी या कामाचे कॉन्ट्रॅक्ट जीआर आयएल इन्फ्रा कंपनीला मिळाला 2022 पासून कामाची सुरुवात झाली राजुरा ते गोविंदपूर पर्यंत वाहणारे आठ नाल्याचे मंजुरी मिळाली मात्र कोट्यावधी रकमेचा महसूल बुडवीत चंदनवाई पांढरपोनी मुठ्रा गोवरी धामणगाव वडगाव आसन वन्सडी देवघाट चनई माडवा घाटराई मेहंदी या संपूर्ण नाल्यांचे मोठ्या प्रमाणात प्रमाणात दगड़ माती मुरुम रेती मंजूर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन केल्याने नाले मोठ्या प्रमाणात खोल झालेत्यामुळे नाल्यातील जलसाठे डोह नष्ट झाले एवढेच नव्हे तर पकडीगडम धरणाच्या मुख्य कालवे नियमबाह्य खोदून रेती दगड मुरूम खोदुन खोल खड्डे तयार झालेपुर नियंत्रक भिंती उद्धवस्तकेले नियम बाहय खोदकामाची तक्रार होताच पाटबंधारे विभागाने दखल घेऊन पोलीसात वपाटबंधारे विभाग कार्यवाहीचा बडगा उगारताच नव्याने नासघुस केलेल्या नियंत्रक भिंत बांधकाम करून दिले.
खोदकामामूळे कालवे खोल झाल्याने होऊन पाळीव प्राणी व नागरिका च्या जीवितेला धोका निर्माणा होऊन जीव गमवण्याची नामुष्की ओढावली आहे अनेक ठिकाणी तलाव नसताना तलाव दाखवून शासनाचा स्वामीत्वधनाला मोठ्या प्रमाणात चुना लावला एवढे नव्हे तर नांरडा येथील नियम बाह्य गिट्टी क्रेशर मधून लाखो ब्रास गिट्टीचा वापर करण्यात आला या भागातील चनई मांडवा कुसळ धानोली टांगाळा रूपापेठ रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे यावर कोणतेही दुरुस्ती केलेली नाही राजुरा तालुक्यात नियमबाह्य भेडवी येथे खोदकाम केले या भागात मुरमाचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले याबाबत झालेले पंचनामे मोजमाप नोंदी उपयोगीता प्रमाणपत्र दिशाभुल करणारे आहे.
हे बनवा बनवी असून इन्फ्रा कंपनीने शासनाच्या तिजोरीला मोठ्या प्रमाणात चुना लावला असून तामसी घाटावरील रेती उत्खननाचे वर्तमान पत्रात बातम्याअनेक लोक प्रतिनिधी तक्रारी केराची टोपली दाखवित चौकशी मोजणी करण्याची मागणी मे महीण्यात झाली १०जूनपासून उत्खनन थांब ले मात्र महसुल व खनिज विभागाचे अधिकारी जून महीण्याचा पुर येई पावितो चालढकल करीत कंपनी वआपले पाप लपविण्यासाठी चौकशी मोजमापाचे पाप गंगे जाई पर्यंत अधिकारी चुप्पी बहीऱ्याचे सोंग व प्रशासनाची डोळेझाक भुमिका संश्याशपद कारणीभूत असून कुसळ येथिल १३ कि.मीक्षेत्रात उत्खनन करुण गावकऱ्याना रपटा बांधुन देण्याचे आश्वासन देऊन दोनवर्ष रात्रदिवसउत्खनन व वाहतुक करुण मोठया प्रमाणात गौण खनिज् घेऊन गेले.
मात्र कंपनीने सि एस आर निधितुन निकृष्ठबांधकाम पुराच्या पाण्यात वाहुनगेल्या गावकर्याना शेतात जाण्याची पंचाईत झाली आहे यामुळे शेतात जाणारा रस्ताच बंद झाल्याने तातडीने रपटा दुरुस्त करण्यात यावा अन्यथा गावकारी राष्ट्रीय महामार्गावर माथा फाटा येथे आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आबिद अली यांनी केली आहे.