समर्थ कृषी महाविद्यालय शहीद दिन व सद्भावना दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न समर्थ कृषी देऊळगाव राजा येथे २० ऑगस्ट शहीद दिन व सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरुवातीलाच प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ.नितीन मेहेत्रे यांनी विद्यापीठ शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या शहिदांचे बलिदान मात्र व्यर्थ गेले नाही कारण विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ रोजी झाली असे सांगितले. याप्रसंगी माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांची जयंती “सद्भावना दिवस” म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांना सद्भावना शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाविद्यालयाचे रासेयो अधिकारी प्रा.योगेश चगदळे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी प्रा.अरुण शेळके व रासेयो स्वयंसेवक यांनी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.अश्विनी जाधव,प्रा.उषा जायभाये,प्रा.गणेश घुगे,प्रा.ज्योती जायभाये,प्रा.किशोर कव्हर,प्रा.विकास म्हस्के विद्यार्थी तथा विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित सर्वांनी गुलाब पुष्प अर्पण करीत शहिदांना वंदन केले.