युवा सेना अध्यक्ष मुनेश्वर बदखल यांचे रस्त्यासाठी आमरण उपोषण सुरू
पिपरी–तेलवासा–ढोरवासा ते सुमठाना–कोची–घोनाड–मुरसा महत्त्वाचा रस्ता अत्यंत : नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पिपरी–तेलवासा–ढोरवासा ते सुमठाना–कोची–घोनाड–मुरसा हा महत्त्वाचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रस्त्याच्या तातडीच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी युवा सेना अध्यक्ष मुनेश्वर बदखल यांनी १६ जानेवारी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
सदर रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कामगार व रुग्णांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असून जड हायवा ट्रक व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची अवस्था अधिकच खराब झाली आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले असून काही नागरिक गंभीर जखमी झाल्याचेही समोर आले आहे.
या संदर्भात अनेक वेळा संबंधित विभागाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेवटी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे वतकर यांनी सांगितले. “जोपर्यंत रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला.
उपोषणस्थळी युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.


