Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण व संवर्धन आवश्यक – कॅप्टन मोहन गुजरकर 

जागतिक पर्यावरण दिन पर्वावर 2024 वृक्षारोप लावण्याचा संकल्प 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘उन्हाळ्यात तापमान दिवसेंदिवस वाढतच आहेत दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर पुर व सुनामी सारख्या नैसर्गिक घटना घडत आहे. एकंदरीत पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असून पर्यावरणाच्या संतुलनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयात आयोजित ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त ‘वृक्षारोपण’ कार्यक्रमात 5 जून रोजी केले.

देवळी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र विभागाच्या विद्यमाने एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी.युनिट, राष्ट्रीय हरित सेना व राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी एन.सी.सी. अधिकारी तथा राष्ट्रीय हरित सेना समन्वयक कॅप्टन प्रा.मोहन गुजरकर तर प्रमुख अतिथी म्हणून वनपाल राजू गिरी, वनरक्षक मयुरी सोपले, कर्मचारी सुरज दुरूगडे, मंगेश काबंळे व सागर तेलंग उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना कॅप्टन मोहन गुजरकर यांनी पर्यावरण दिन पर्वावर स्वयंसेवक व छात्र सैनिकांच्या माध्यमातून 2024 वृक्षारोप लावण्याचा संकल्प बोलून दाखवला तर वनरक्षक मयुरी सोपले यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून दिले.

कॅडेट श्रद्धा मडकाम, साक्षी येळणे, मनोज नेहारे, आकाश कन्नाके, रसिका बानकर व साहील रामगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 संचालन सिनिअर अंडर ऑफिसर शेखर भोगेकर व ज्युनियर अंडर ऑफिसर अक्षय जबडे यांनी तर आभार सार्जंट आदित्य तामगाडगे याने मानले. कार्यक्रमाची सांगता ‘पर्यावरण संवर्धन संकल्पा’ची शपथ घेऊन झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये