Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसचे डॉ.नामदेवराव किरसान यांच्या विजयाचा सावलीमध्ये जल्लोष

फटाके आणि गुलाल उधळून केला जल्लोष साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये आज झालेल्या ४ जून रोजी झालेल्या मतगणनेच्या दिवशी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र येथे महाविकास आघाडी चे उमेदवार डॉ. नामदेव किरसान हे १ लाख ४० हजार २३४ मतांनी विजयी झालेले आहेत.डॉ नामदेव किरसान यांनी महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांचा जवळपास १ लाख ४० हजार २३४ मतांनी पराभव केलेला आहे.

12 गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 6 लाख 17 हजार 792 मते प्राप्त झाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी हा निकाल जाहिर केला. डॉ. किरसान यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यावेळी उपस्थित होत्या.

         शासकीय कृषी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया झाली. अन्य उमेदवारांना प्राप्त मते अशोक नेते, भारतीय जनता पार्टी (476096), योगेश गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (19055), धीरज शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (2174), बारीकराव मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (2555), सुहास कुमरे, भीमसेना (2872), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (15922), करण सयाम, अपक्ष (2789), विलास कोडापे, अपक्ष (4402), विनोद मडावी, अपक्ष (6126), नोटा (16714). एकूण वैध मते 11 लाख 66 हजार 497 अनुक्रमे मते घेतली आहेत.

          आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतलेल्या नामदेव किरसान यांनी कुठेही पिछाडी झाली नाही व जवळपास पूर्ण मतमोजणी च्या फेऱ्या पूर्ण होत पर्यंत आपले मताधिक्य कायम ठेवले. व आपला विजय पूर्ण केला.

*सावली येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जल्लोष*

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून डॉ. नामदेव किरसान हे विजय झाल्याने तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सावली शहरात भव्य फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

*सावली भाजपा कार्यालयात शुकशुकाट*

 भारतीय जनता पार्टीच्या मूल – गडचिरोली रोडवरील कार्यालयात आज अशोक नेतेंच्या पराभवाने झाल्याने शुकशुकाट पसरला होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये