ताज्या घडामोडी

टपाली मतांत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी देशभरात सुरू असुन राज्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मतमोजणी सुरू झाली असुन सर्वप्रथम टपाली मतांची मोजणी करण्यात आली असुन ह्या मतपत्रिकांत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर ह्यांनी भाजपचे उमेदवार तथा राज्याचे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार ह्याच्यावर 1537 मतांची आघाडी घेतली आहे.

उमेदवार निहाय प्राप्त मतांची संख्या 

कांग्रेस प्रतिभा धानोरकर 9 हजार 278, भाजप सुधीर मुनगंटीवार 7 हजार 741, वंचित बहुजन आघाडी राजेश बेले 113, बसपा राजेंद्र रामटेके 234, अपक्ष संजय गावंडे 82, अपक्ष नामदेव शेडमके 78, दिवाकर उराडे 45, सेवकदास बरके 43, अवचित सयाम 23, अशोक राठोड 22, मिलिंद दहिवले 21, पूर्णिमा घोनमोडे 21, वनिता राऊत 20, विद्यासागर कासरलावर 19, विकास लसंते 12, नोटा 147

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये