ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बिबी कॉंग्रेसचे माजी ग्रा. पं. सदस्य नरेंद्र अली यांचा भाजप मध्ये प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

तालुक्यातील नांदा फाटा येथे बीबीचे माजी ग्रा.पं. सदस्य तथा कॉंग्रेस कार्यकर्ता श्री. नरेंद्र अली यांनी विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला.

ते आमदार सुभाष धोटे यांचे समर्थक आणि कॉंग्रेसचे उपसरपंच आशिष देरकर यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्या भाजपा प्रवेशाने स्थानिक पातळीवरील युवकांमध्ये भाजपचा विचार पोहचविण्यासाठी निश्चितच मदत होईल, अशी आशा व्यक्त करीत अली यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी देवराव भोंगळे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष संजय मुसळे, नांदाचे उपसरपंच पुरूषोत्तम आस्वले, सचिन आस्वले, नितेश बेरड, रविकुमार बंडीवार, मनोहर चव्हाण, अरुण क्षिरसागर, रामस्वामी चंद्रगिरी, सुरेश मलेईकोरवन, दिपक पिसे, शाहरुख शेख, अनिल मुंगटी, सुहास येडमे, स्वप्निल पावडे, रवि तामगाडगे, महेश तांड्रा, प्रविण चिकानकार, अजय पेटकर यांचेसह आदिंची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये