ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव मही शिवारात शॉर्टसर्किटमुळे सव्वा एकरातील ऊस जळाला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शेतातून गेलेल्या लघुदाब विद्युत वाहिनीतून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे देऊळगाव मही शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातील सव्वा एकर ऊस जळाल्याची घटना १ जून रोजी घडली.विद्युत वितरण कंपनीचे अभियंता यांनी घटनास्थळी जाऊन स्थळ पंचनामा केला आहे.

 देऊळगाव मही येथील ज्ञानबा गबाजी शिंगणे यांची देऊळगाव मही शिवारात शेती आहे. यातील गट नं १३०/६ व १३१/१ अडीच एकर क्षेत्रावर त्यांनी ऊसाची पेरणी केली होती. सदर ऊस काढणीच्या बेतावर असताना १ जून रोजी ऊस पिकाच्या क्षेत्रावरून गेलेल्या लघु विद्युत दाब वाहिनीतून शॉर्टसर्किट होऊन ऊसाला आग लागली.व सुमारे सव्वा एकर क्षेत्रातील ऊस जळून मोठे नुकसान असून सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान विद्युत वितरण कंपनीचे अभियंता गणेश रामदास वीर यांनी स्थळ पंचनामा केला असून विद्युत वितरण कंपनीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी ज्ञानबा शिंगणे यांनी केली आहे.तालुक्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या आठवड्यात मेव्हणा राजा व देऊळगाव मही शिवारात ऊस पिकाला आग लागल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.

 या घटना कार्यालयात जाऊ शकतात

गाव शिवारामध्ये गेल्या कित्येक वर्षाच्या जुन्या विद्युत वाहिन्या महावितरण कडून टाकण्यात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी विद्युत पोलचे निष्कर्षण ( गॅरंटी ) संपलेली असताना त्याकडे महावितरणचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे फक्त तात्पुरत्या दुरुस्ती करून काम दाखवून दिल्या जाते परंतु शेतकऱ्यांच्या शेतामधून लोमकळणाऱ्या तारा आजच्या घटनेला कारणीभूत ठरत आहे ,या घटना टाळण्यासाठी महावितरण विद्युत वाहिन्या बदलून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये