ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विलास अंबादे यांचा सेवानिवृत्ती निरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अतुल कोल्हे

      विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक विलास अंबादे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ बँकेच्या शाखेत पार पडला.

 यावेळी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक महादेव राणे,बँकेचे खातेदार दिलीप ठेंगे,राजू गैनवार,अजय रामटेके उपस्थित होते. अंबादे यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यांनी बँकेला दिलेल्या ४० वर्षाच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दी बद्दल राणे यांनी त्यांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रुजू झालेले शाखा व्यवस्थापक अमोल कथाले, चेतन पाचभाई,रजत इटणकर, किसन दूधबळे, कल्याणी ठाकरे उपस्थित होते. सर्वांनी त्यांच्या कार्यकाळाला उजाळा देऊन शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये