स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेत्यावर धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 14/04/25 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक उपविभाग हिंगणघाट परीसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त निमित्त पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे वार्ड नं. 02 आर्वी (छोटी), तह. हिंगणघाट येथे आरोपी संतोश लोहकरे याचे राहते घरी दारूबाबत प्रो.रेड केला असता, आरोपी संतोश लोहकरे व त्याचा साथीदार गणेश कुडमते यांना पोलीस आल्याचे दिसताचं ते मोक्कावरून पळुन पसार झाले.
पंचासमक्ष आरोपीचे राहते घराची कायदेशीररित्या झडती घेतली असता, झडती दरम्यान घरामागे उभ्या असलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये देशी-विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद शिशा मिळुन आल्या असुन, सदर दोन्ही आरोपी हे संगणमताने त्यांचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता अवैधरित्या दारूविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, घटनास्थळावरून 1) देशी दारूने भरलेल्या प्रत्येकी 90 एम.एल.च्या ( प्रिमीयम नं. 01-211, सोनी सौफ-52) अशा एकुण 263 सिलबंद शिशा कि 26,300 रू, 2) विदेशी दारूने भरलेल्या रॉयल स्टॅग कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 30 सिलबंद शिशा कि. 10,500 रू, 3) दारू मालाची वाहतुक व साठवणुक करण्याकरीता वापरलेली एक सिल्व्हर रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी क्र. MH-19/Q- 8502 कि. 6,75,000 रू असा जु.कि. 7,11,800 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, आरोपी नामे 1) अमोल संतोश लोहकरे 2) गणेश महादेव कुडमते दोन्ही रा. वार्ड नं. 02 आर्वी (छोटी), तह. हिंगणघाट, यांचेवर पोलीस स्टेशन वडणेर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. प्रकाश लसुंते, पो.अं. शेखर डोंगरे, अरविंद येनुरकर, विनोद कापसे, सुगम चौधरी, शुभम राउत सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.