ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रंथालय चळवळीने वाचन संस्कृती समृद्ध केली – आ. किशोर जोरगेवार

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पब्लिक लायब्ररी: अ रोडमॅप फ्रॉम अमृत महोत्सव टू अमृतकाल दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप

चांदा ब्लास्ट

वाचन हे ज्ञानाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. पुस्तकांमधून आपल्याला विविध विषयांवरील माहिती मिळते. ग्रंथालय चळवळीने ही वाचन संस्कृती समृद्ध केली असून ग्रंथालयीन चळवळीचे प्रश्न सोडविण्याकरिता मी विधीमंडळामध्ये संसदीय आयुधांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

   दि. ३० जून २०२४ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयामध्ये राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनच्या सहयोगाने श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर द्वारा संचालित स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालयचंद्रपूर तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयचंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात आ. किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष अनिल बोरगमवारसुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकरडॉ. सुधीर आष्टूंकरडॉ. संजय भुत्तमवाररत्नाकर नलावडेप्राचार्य संतोष शिंदे आदीची प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीकोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असलो तरी वाचन नियमित केल्याने आपली त्या-त्या क्षेत्रात विशेष प्रगती होते. आपण मतदार संघात ११ सुसज्ज अभ्यासिका तयार करत असून हा ग्रंथालय चळवळीचा भाग आहे. वाचनामुळे आपल्या विचारशक्तीला धार येते. आपल्याला विविध लेखकांच्या विचारसरणीचे आणि तत्त्वज्ञानाचे ज्ञान होते. त्यामुळे आपल्या तर्कशक्तीमध्ये वाढ होते. वाचनामुळे आपल्या भाषेचा विकास होतो. नवीन शब्दवाक्यरचना आणि व्याकरणाच्या नियमांचे ज्ञान आपल्याला यातून मिळते. वाचन हे मानसिक स्वास्थ्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. वाचनामुळे आपल्याला विविध समाजांचीसंस्कृतींची   आणि परंपरांची  माहिती मिळते. यामुळे आपली सामाजिक जाणीव वाढतेअसे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.

     यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये अनिल बोरगमवार यांनी ग्रंथालयाची समृद्ध वाटचाल व तिच्या समस्यांविषयी भाष्य केले. तर वाचनामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन उन्नत समाजाची निर्मिती होतेअसे मत कवयित्री पद्मरेखा धनकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष शिंदे यांनी केले. संचालन प्राध्यापक श्रीकांत साव यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. दीपाली दांडेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक वृंदग्रंथालय कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये