ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर नगर परिषद निवडणूक : काँग्रेसला मिळाला तरुणाईचा जबरदस्त पाठिंबा, निवडणुकीत स्थिती आणखी भक्कम

गोंडवाना पक्षाचे महेश परचाके यांच्यासह भाजप आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला मोठा राजकीय बुस्ट मिळाला आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत गोंडवाना पक्षाचे महेश परचाके यांच्यासह भाजप आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करून आघाडीला महत्त्वाचा ताकदवान आधार दिला.

या प्रवेशामुळे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी आणि जनविकास गोंडवाना पक्षाच्या “नगर विकास आघाडी”चा पाया अधिकच मजबूत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्थानिक पातळीवर युवांची एकत्रित शक्ती काँग्रेसकडे वळल्यामुळे नगरपरिषदेच्या रणधुमाळीत काँग्रेस आघाडी बाजी मारेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये गोंडवाना गणतंत्र पक्षाचे संदीप परचाके, सुनील सिडाम, विजय गेडाम, राहुल टेकाम, गणेश कुमरे, राजेंद्र सिडाम, आकाश परचाके, राजाराम परचाके, शुभम आत्राम, सुरेश सिडाम, अनंता सिडाम, आकाश मडावी, प्रफुल्ल कोटनाके, शंकर परचाके, अनिल सातपुते, अनिकेत कोटावार यांचा समावेश आहे. तसेच भाजपचे राकेश सुरकर, अभिनव दुबे, प्रसाद सुरनार, भास्कर पोले, क्षितिज गोरगरे, अभिषेक सुरनार, साईप्रसाद येमुलवार, प्रवीण चौधरी, रामासर केवट, तरोउत्तम केवट, जितेश देवकते, शितूजल केवट यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते काँग्रेसच्या विचारधारेत सामील झाले.

कार्यक्रमात काँग्रेस–शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे–वंचित बहुजन आघाडी आणि जनविकास गोंडवाना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सचिन भोयर यांची तरुण नेतृत्वशक्तीही ठळकपणे दिसून आली. प्रवेश सोहळ्यास तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम पेचे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, बाळासाहेब मोहितकर, विठ्ठल थिपे, शिवसेना नेते विजय ठाकूरवार, शिवसेना राजुरा विधानसभा प्रमुख सागर ठाकूरवार, वंचित बहुजन आघाडी निरीक्षक दिव्यकुमार बोरकर, सल्लागार मधुकर चुनारकर यांच्यासह आघाडीतील सर्व नगरसेवक पदांचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे यांनी केले.

युवांच्या या प्रभावी सामंजस्यामुळे काँग्रेसचा जनाधार वाढला असून गडचांदूरमध्ये बदलाची लाट काँग्रेसच्या दिशेने वाहत असल्याचे राजकीय समीक्षकांचे मत आहे. नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस आघाडी अधिक मजबूत स्थितीत उतरणार असून प्रचार मोर्चात मोठी ऊर्जा आणि उत्साह दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस आघाडी निर्णायक भूमिका बजावेल, असे वातावरण आता स्पष्टपणे दिसत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये