निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनाचे राज्य कार्याध्यक्ष इंजिनिअर मनोहर पोकळे यांची देऊळगाव राजा येथे बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
विरंगुळा भवन येथे महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष इंजि. मनोहर पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 नोव्हेंबर रोजी सभा पार पडली यामध्ये पोकळे यांनी संघटनेचे ध्येय धोरण व राज्यस्तरीय कार्य विषद केले. याप्रसंगी त्यांच्या सोबत संघटनेचे सरचिटणीस टी.के. गुरव साहेब यांनी सुद्धा मार्गदर्शन केले
सभेच्या अध्यक्ष स्थानी देऊळगाव राजा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे माजी अध्यक्ष गोविंदराव अहिरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा चे अध्यक्ष काशीनाथ खांडेभराड, मधुकर धुळे, प्रा विजय रायमुलकर, पंडितराव पाथरकर, तथा इतर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन श्री काशिनाथ खांडेभराड यांनी केले तर आभार प्रा.विजय रायमुलकर यांनी मानले , याप्रसंगी तालुका संघटनेच्या सदस्यांनी सदर संघटनेचे आजीवन सदस्यत्व स्विकारले…



