Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेस तर्फे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती शहर तथा तालुका काँग्रेस तर्फे शहरातील धानोरकर कार्यालयात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, काँग्रेसचे जिल्हा महासचिव धनंजय गुंडावर, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सरिता ताई सूर, माजी नगरसेवक प्रफुल चटकी, लक्ष्मण बोढाले, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, शोभाताई पारखी,प्रशांत झाडे, राष्ट्रवादीचे मुनाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले, तसेच शहरातील बंगाली कॅम्प येथील वृद्धाश्रमात भोजनदान देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये