चंदनखेडा येथेअवैद्य रेती साठा जप्त
तहसीलदार राजेश भांडारकर यांचे धडाकेबाज कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील अवैद्य रेतीला उधाण आले आहे या प्रकाराला आळा घालण्यासाठी तहसीलदार राजेश भांडारकर यांचे नेतृत्वात गौण खनिज पथक यांनी मोहीम सुरू केली आहे त्याअंतर्गत गौण खनिज पथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू आहे आज दिनांक 20/4/2025 रोजी सकाळी 5:55 वाजता मौजाचंदनखेडा येथे एम.एस.ई.बी.कार्यालय जवळ बंधाऱ्याचे काम सुरू आहे सदर ठिकाणी अवैद्य रेतीच्या साठा आढळून आलेला आहे गौण खनिजपथक यांनी सदर रेतीसाठा ची तपासणी केली असता स्थानिक ठिकाणी टी, पी ,आढळून आलेली नाही मोका तपासणी केली असता तेथील मजुरांनी सांगितले सदर रेती साठा जिल्ह्यातील मोठ्याराजकीय पुढारी यांच्या समर्थक असल्याचे सांगितलेआहे.
सदर रेतीसाठा पंचनामा करून सदर रेती साठा पोलीस पाटील श्री समीर खान पठाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले सदरची कारवाई गौण खनिज पथक नायब तहसीलदार श्री सुधीर खांडरे मंडळ अधिकारी दडमल व तलाठी तलहार व तलाठी मैदमवार यांनी केली असून महसूल विभाग यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष आहे