कारसह देशी दारूचा 13 लाख 93 हजाराचा मुद्देमाल जप्त
स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 28/04/2025 रोजी रात्र दरम्यान स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन पुलगाव हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करता तसेच गुन्हेगार चेकिंग करता पुलगाव येथे हजर असता हजर असताना मुखबीर कडून माहिती मिळाली की वर्धा जिल्ह्यातून हद्दपार असलेला गुन्हेगार नामे प्रशांत चांडाले राहणार पुलगाव हा त्याचे ताब्यातील सिल्वर रंगाची हुंडाई क्रेटा कंपनी चे MH 40 AR.7244 नंबरच्या कार मधून अमरावती जिल्ह्यातील विटाळा येथून अवध्यरित्या मोठ्या प्रमाणात देशी दारू चा माल बाळगून पुलगावातील नाचणगाव चौरस्ता वरून कवठा झोपडी येथे जाणार आहे. अशा माहिती वरून त्याच्यावर नागपूर औरंगाबाद हायवे वर ऋषी राज धाबा येथे नाकाबंदी करून प्रो. रेड केला असता आरोपी नामे प्रशांत प्रदीप चांडाले वय 23 वर्ष रा. रामटेके लेआऊट पुलगाव त.देवळी जि. वर्धा हा त्याची ताबातील कार मध्ये अवैध्यरीत्या देशी दारूचा माल बाळगून मिळून आला तर एक वि स बालक हा आरोपीच्या कारची पॉलिटींग करीत असताना मिळून आला, मिळाल सदर आरोपीचे ताब्यातून 1) देशी दारू च्या 180 ml च्या 240 सिलबंद शिश्या किंमत 48,000/- रु, एक 2)सिल्वर रंगाची हुंडाई क्रेटा कंपनीची MH 40 AR 7244 क्रमांकाची कार किंमत 12,00,000/-रु 3)एक मोपेड ऍक्टिवा गाडी क्रमांक एम एच 32 ए डब्ल्यू 1216 किंमत 1,00,000/-रु 4) दोन अँड्रॉइड मोबाइल किंमत 45, 000/- रुपये असा एकूण 13,93,000/- रुपये चा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी प्रशांत चंडाले याला सदरचा माल कोठून आणला याबाबत विचारणा केली असता सदरचा बाल उदय बार विटाळा, जिल्हा अमरावती येथून आणल्याचे सांगितले वरून तीन आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन पुलगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार पो .हवा शेखर डोंगरे, पो .हवा सचिन इंगोले, पो. हवा प्रमोद पिसे, पो ना शि. रामकिसन इप्पर पो . शि विकास मुंडे, पो.शि सुगम चौधरी, पो. शि अरविंद इंगोले, पो शि. शुभम राऊत, पो शि. राहुल अधवाल सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली