मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस
आरोपीतांकडुन गुन्हयातील १ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
फिर्यादी नामे कार्तीक बाबाराव भोयर, वय २३ वर्ष, रा. करंजी भोगे जिल्हा वर्धा यांनी पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे दिनांक ०९/१२/२०२४ रोजी तक्रार दिली की, त्यांची मोपेड गाडी अॅक्टीव्हा क्रमांक एम. एच.३२ जेड ९१४९ ही सावंगी मेघे हॉस्पीटल समोर ठेवून असतांना कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेली अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून अज्ञात आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे अपराध क्रमांक ८४१/२०२४ कलम ३०३(२) भा.न्या.सं., अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे संमातर तपास करीत असतांना पथकासह पोलीस स्टेशन सावंगी मेघे हद्दीत पेट्रोलींग दरम्याण गोपनिय माहीती मिळाली की, सांवगी मेघे टी पाईट जुना बायपास रोडचे उडडानपुलाजवळ ०२ संशयीत ईसम दोन मोपेड गाडीवर बसून असुन मोपेड वाहन विकण्याकरीता ग्राहक शोधत आहे, अश्या माहीतीवरून त्याची शहानिशा करून त्याचेवर योग्य ते कायदेशीर कारवाई करीता पोस्टाफसह सांवगी मेधे टी पाईटजवळील जुना उडडानपुलाजवळ गेलो असता तेथे २२ इसम हे दोन मोपेड वाहनावर बसून असलेले दिसले. पो. स्टाफचे मदतीने दोन्ही इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, गांव, पत्ला विचारले असता १) प्रतिक प्रमोद लेंढे, वय २३ वर्ष, रा. सोमनाथे ले आउट, सिंध्दी मेघे, वर्धा, व त्याचे सोबत एक २) विधी संघर्षित बालक रा. वर्षा असे असल्याचे सांगितले, त्यांना त्यांचे ताब्यात असलेल्या दोन्ही मोपेड गाडीबाबत विचारणा केली असता इसम प्रतिक लेंढे याने माहिती दिली कि, दिनांक ०८/१२/२०२४ रोजी सावंगी मेघे दवाखान्याचे रोडवरील पार्कीगमधुन पांढ-या रंगाची अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्रमांक एम. एच. ३२ झेड ९१४९ हि रात्रीचे वेळी त्याचे साथीदारसह माझे मोपेड गाडीने येवुन अॅक्टीव्हा गाडीला टोचण मारून त्याचे राहते घरी सोमनाथे ले आउट येथे घेवून गेले. अशी माहिती दिल्याने पंचासमक्ष १) एक जुनी वापरती होडा कंपनीची अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ३२ झेड ९१४९ हीची पाहणी केली असता सदर वाहन हे पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील गुन्हयातील चोरी गेलेली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे पासुन सदर वाहनासह गुन्हयात वापरण्यात आलेले वाहण २) एक जुनी वापरती मॅट ग्रे रंगाची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम.एच.३२ ए.व्ही. ९९९४ असा एकुण किंमत १,४५,०००/- रूपयाचा मुद्देमाल गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करून ताव्यात घेतला. सदर गुन्हयातील आरोपीतां गुन्हेचे पुढील तपास कामी पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, सपोनि रेवतकर, पोउपनि श्री. बालाजी लालपालवाले, पोलीस अंमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरगे, रितेश शर्मा, गोपाल बावणकर, अमोल नगराळे, मंगेश आहे, दिपक साठे, प्रफुल पुनवटकर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.