ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिमहत्त्वाचे व्यक्ती : वर्धा जिल्हा भेट दौरा बंदोबस्त दरम्यान वाहतूक नियोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 16/04/2026 रोजी अतिमहत्वाचे व्यक्तींच्या वर्धा जिल्हा भेट दौऱ्या असल्याने सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वा.पावेतो सेवाग्राम व वर्धा शहरातील काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून काही मार्गांवर काही वेळा करीता वाहतूक बंद करण्यात येणार आहे तरी वाहतूकीचा खोळंबा होऊ नये वाहतूक जाम होऊ नये अपघात होऊ नये याकरिता सौरभ कुमार अग्रवाल पोलिस अधीक्षक वर्धा यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलीसांनी सेवाग्राम व वर्धा शहरातील तसेच महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली असून सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत यादरम्यान काही काळासाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

तरी जिल्हा वाहतूक शाखेकडून नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की सदर काळामध्ये पर्यायी मार्गाचा वापर करावा किंवा अत्यावश्यक नसल्यास सदर मार्गावर जाणे टाळावे व वाहतूक नियोजनास सहकार्य महिला आश्रम ते सेवाग्राम रोड तसेच मसाळा बायपास सकाळी वेळ 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत यादरम्यान काही वेळ बंद राहणार.(2) दत्तपूर ते नागपूर कडे व महामार्गावर जाणार रस्ता (3)यवतमाळ कडून वर्धा नागपूर कडे जाणारा रस्ता बुटीबोरी तुळजापूर महामार्ग (4)नागपूर कडे जाणारा समृद्धी महामार्गाचा वापर करावा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या दरम्यान 20 —20 मिनिटांनाकरीता बंद राहिल (5) सेवाग्राम मेडिकल चौक ते मांडगाव ते पवनार कडे जाणारा रस्ता सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता दरम्यान 20—-20 करीता बंद राहील. (6) हेलीपॅड ते बापू कुटी हा रस्ता सकाळी 10 वाजता ते दुपारी 2 वाजता या दरम्यान 20—–20 मिनिट करीता बंद राहील अतिमहत्त्वाचे व्यक्तीचा वाहन ताफा निघून गेल्यानंतर सदर मार्गाचा वापर करण्यात येईल या बाहेरील मार्गाचा वापर करावा गर्दीचा मार्ग वापरु नये काही अडचण आल्यास डायल 112 या टोल फ्री नंबर वर माहिती द्यावी व वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलीस शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील वर्धा…..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये