महात्मा गांधी विद्यालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :_ महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षिका माधुरी मस्की , समिती प्रमुख प्रा. नंदा भोयर, प्रा.प्रभाकर कोल्हे, ज्येष्ठ शिक्षिका पोगुलवार, श्रीमती भारती घोंगे उपस्थित होत्या, सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा झाडे मॅडम प्रा नरेंद्र हेपट , प्रा रोशन मेश्राम, संतोष अमृता इखारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, संचालन वामन टेकाम यांनी केले तर आभार प्रदर्शन तोडासे यांनी केले, या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



