वैशाली कासारे यांच्या पुढाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सुशोभीकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्ग वर पोस्ट ऑफिस समोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आहे याच परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी मोकळी जागा होती या जागेत नगर परिषदेच्या महिला व बालकल्यान समितीच्या सभापती वैशाली कासारे व त्यांचे पती विकास कासारे यांनी मोकळ्या जागेत पेवर ब्लॉक बसवण्यासाठी न.प. कडे मागणी केली नगर परिषद प्रशासनाने सुद्धा त्यांच्या मागणीनुसार *ऑन द स्पॉट फैसला* करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवून त्या जागेचे सुशोभीकरण केले याकरिता समाज बांधव यांच्या वतीने न. प .प्रशासनाचे व वैशाली कासारे यांचे आभार मानले आहे.
याबाबत सविस्तर असे की शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे बाजूला असलेल्या खुल्या जागेत पेवर ब्लॉक बसवून देण्यात यावे अशी मागणी महिला व बालकल्याण समिती सभापती वैशाली कासारे यांनी नगराध्यक्ष माधुरी शिपने व मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्याकडे केली या दोघांनी तात्काळ यास मान्यता देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच त्या मोकळ्या जागेत पेवर ब्लॉक बसवून संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण केले.
नगरपरिषदेच्या या ऑन द स्पॉट फैसल्यामुळे या परिसरातील समाज बांधवांनी व नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानून वैशाली कासारे व विकास कासारे यांचे विशेष आभार मानले आहे.



