ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना,सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे आज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी मामा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक संघटना चे अध्यक्ष मधुकर शेळके, प्रकाशराव दत्तराव, आशाताई शेळके होत्या, याप्रसंगी गोविंदराव अहिरे,प्रकाश अहिरे, गोविंदराव बोरकर,प्रा. अशोक डोईफोडे, रमेश नरोडे, प्रा विजय रायमल,शांतीलाल निरफळे, रमेश गवई, पंडितराव पाथरकर, मधुकरराव धुळे, कैलास शेळके, घनश्याम भंडारे, बबनराव नागरे, बाबुलाल शिवरकर, तथा इतर उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या घडामोडी बद्दल सविस्तर माहिती दिली, त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मधुकर शेळके यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये