डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती वर्धा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे साजरी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला कुमारी वैशाली भलावी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक रोजी 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला 135 वर्षे पूर्ण झाले असून या निमित्ताने वनपरिक्षेत्र कार्यालय वर्धा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी वर्धा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुमारी वैशाली भलावी तहस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर अमोल जाधव क्षेत्र सहाय्यक यांनी अभिवादन केले यानंतर ए.जी.गिते वनरक्षक यांनी व एम.एस.माने वनरक्षक दहेगाव मस्की यांनी सुद्धा अभिवादन केले असून यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय वर्धा येथील सर्व कर्मचारी यांनी अभिवादन केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र कार्यालयातील सोमन श्रीरामे वनरक्षक जी.एस.सयाम क्षेत्र सहाय्यक वडनेर गिरीश गायकवाड क्षेत्र सहाय्यक पुलगाव मंजू रेवाळे हिंगणघाट इत्यादी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.



