ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्णा तालुक्यात भाजपा कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

तालुक्यातील अनेक गावात भाजपा कार्यकर्ते जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयंती साजरी  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. विजय वासेकर

पोंभुर्णा :_ भारतीय जनता पार्टी (भाजपा) पोंभुर्णा तर्फे तालुक्यात विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

यावेळी ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी एकत्र येत सामाजिक समतेचा संदेश दिला.

कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक ठिकाणी मार्गदर्शनपर भाषणे, प्रभातफेरी व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाला उपस्थित तालुका अध्यक्ष हरिपाटील ढवस अलकाताई आत्राम सुलभाताई पिपरे वैशाली ताई बोलमवार अजित मंगळगिरीवार राहुल संतोष वार ऋषीजी कोटरगे गुरुदास पिपरे दर्शन गोरंटीवार मनोज रणदिवे जमनादास गोवर्धन मोहन चलाक दिलीप मेकलवार विजय वासेकर अविनाश ढोंगे महेंद्र बनकर, सुयोग गेडाम श्वेता ताई बनकर आकाशी गेडाम, ईश्वर नैताम  यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये