ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा गोजोली मक्ता येथे यशोगाथा उपक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी : तालुक्यातील गोजोली मक्ता हे गाव आदिवासी बहुल असल्याने येथील सामान्य परिवारातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे तसेच भविष्यात आपले करिअर उत्तम पद्धतीने निवड करता येईल, या उदात्त हेतूने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोजोली मक्ता येथे मुख्याध्यापक मुरलीधर सरकार यांच्या संकल्पनेतून यशोगाथा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी दीपक माडुरवार याचे मार्गदर्शन लाभले.

देशाचे भविष्य हे ग्रामीण भागात आहे असं म्हणतात, ते खरच आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षण घेऊन जर पुढे जाण्याचे निर्धार करीत असेल तर उद्याचा भारत देश हा नक्कीच उज्वल व प्रगतिशील असेल हे मात्र नक्कीच. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रामाणिक प्रयत्न करून यशाचा उंच शिखर गाठू शकतो, असे मत प्रमुख वक्ता दीपक माडुरवार यांनी यशोगाथा कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनो तुम्ही पण मोठे स्वप्न बघा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा,नक्कीच तुम्ही यशाचा उंच शिखर गाठू शकाल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

 कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बिंदु पेंदोर, सुनील सोनुले, किशोर शेडमाके विनोद कुंबरे, संतोष कळते, साईनाथ मोहूर्ले, भावना शेंडे यांची उपस्थिती होती. शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि गावातील गावकरी यांनी यशोगाथा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका साधना उराडे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक भवेश विश्वास यांनी केले. याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी, छात्राध्यपक, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये