ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी ७० हजार रुपयाचे भांडे केले लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे जुनी नगर परिषदे च्या मागे राहत असलेल्या राजे संजय मानसिंग राव जाधव यांच्या घराच्या ग्रिलच्या दरवाजा चे कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश करून घरातील किचन मधे ठेवलेले ३चांदीचे ताट वजन प्रत्येकी ४००ग्रॅम, ४चांदीच्या वाट्या, प्रत्येकी वजन १५०ग्रॅम,असे एकूण १८००ग्रॅम वजनाचे ७०, ०००रुपये चे चांदीचे भांडे चोरून नेले. सदर घटना १ ते ५ मे च्या दरम्यान पहाटे तीन च्या दरम्यान घडली आहे.

फिर्यादी राजे संजय जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा द वी कलम ३८०,४५४,४५७, अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ले करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये