ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली

शिधा धारकांना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा   

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगराळ दुर्गम आदिवासी बहुल भागात शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरण केल्या जाते मात्र डिसेंबर 2023 पासून एप्रिल पर्यंत गेल्या पाच महिन्यात शंभर टक्के मोफत धान्याच्या लाभापासून अनेक गावातील शिधापत्रिका धारक वंचित असल्याने नागरिकांची ओरड आहे अनेक दुकानात अंतोदय लाभार्थी करिता 35 किलो मोफत धान्य तर प्राधान्यक्रम कुटुंबाकरिता प्रति व्यक्ती पाच किलो धान्य प्रधानमंत्री मोफत धान्य वितरण योजनेअंतर्गत दिल्या जाते मात्र डिसेंबर पासून अनेक दुकानांमध्ये मंजूर नियतन प्रमाणे धान्य दिल्या जात नसून स्वस्त धान्य दुकानदार प्रत्येक शिधापत्रिका धारकाच्या मंजूर धान्यापेक्षा कमी धान्य देऊन वितरण केल्या जात आहे.

मात्र चार महिन्यापासून धान्य वितरण व्यवस्था कोलमडली असून धान्य का कमी दिल्या जाते यामागील कारण मात्र अजूनही ग्राहकांना कळलेले नाही अनेक ठिकाणी प्रत्येक महिन्यामागे धान्य कपात करून स्वस्त धान्य दुकानदाराला धान्य दिल्या जात नसल्याने दुकानदार सुद्धा ग्राहकांना कपात करून धान्य दिल्या जात आहे अनेक गावांमध्ये 35 किलो ऐवजी 25 ते 30 किलो धान्य तर इतर कुटुंबांना पाच किलो प्रति व्यक्ती ऐवजी तीन ते चार किलो धान्य दिल्या जात आहे दुकानदारांना विचारणा केली असता गोडाऊनमध्ये धान्यकमी असल्याने दर महिन्याला कपात करून धान्य मिळत असल्याचे कारण सांगितले जाते.

कोरपणा तालुक्यामध्ये एकूण 97 स्वस्त धान्य दुकान असून अंत्योदय लाभार्थी 7339 तर प्राधान्य कुटुंब 15404 असे एकूण 22 743 कुटुंबांना दरमहा धान्य वितरण केल्या जाते मात्र गेल्या चार महिन्यापासून ग्राहकांना याचा फटका बसला असून नेमके धान्य कपात करून देण्यामागील कारण काय हे एक कोडेच आहे कोरपणा तालुक्यातील प्रधानमंत्री मोफत धान्य योजना 97 वही दुकानांमध्ये नियतन मंजुरी प्रमाणे उपलब्ध करून देण्यात यावे व यापुढे कमी प्रमाणात धान्य वितरण करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानावर कारवाई करण्यात यावी.

अशी मागणी अनेक गावातील नागरिकांनी केली आहे गेल्या ५ महिण्या पासून अपूर्ण धान्य पुरवठयाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस चे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कडे पत्राद्वारे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये