ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वप्नील मेश्राम यांची आय. सी. एम. आर सिकल्सेल विभाग येथे ब्लॉक प्लेसमेंट

एक महिन्याच्या प्रशिक्षणातून जाणून घेणार संस्थेचे विवीध कार्य

चांदा ब्लास्ट

 स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील एम. एस. डब्ल्यु द्वितीय वर्ष वैद्यकिय व मन: चिकित्सक समाजकार्य विशेषिकरणाचा विद्यार्थी स्वप्नील रमेश मेश्राम याची पडोली, चंद्रपूर येथील आय.सी. एम. आर सिकल्सेल संशोधन विभाग येथे दिनांक २ मे ते ३ जुन या कालावधीत एक महिन्याचे ब्लॉक प्लेसमेंट होणार आहे.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली च्या अभ्यासक्रमानुसार ब्लॉक प्लेसमेंट अनिवार्य असते. या ब्लॉक प्लेसमेंट मध्ये संस्थेचे विवीध कार्य, होणारे कार्यक्रम, संस्थेची एकूण माहिती घ्यावी लागते आणि हा संपूर्ण अहवाल विद्यापीठाला सादर करावा लागतो.

महाविद्यालयाच्या अनेक उपक्रमात नेहमी सक्रिय राहिलेला स्वप्नील हा युवा साहित्यीक आहे. अनेक कविता विविध वृत्तपत्रात, दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या आहेत. अनेक पुरस्काराने तो सन्मानित आहे. ग्राफिक्स डिझाईनर सुध्दा असल्याने जनजागृती करण्याकरीता या कौशल्याचा उपयोग तो भविष्यात करणार आहे.

प्राचार्य ( प्रभारी ) डॉ. जयश्री कापसे , प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे यांचे विशेष मार्गदर्शन ब्लॉक प्लेसमेंट करीता मिळणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये