पाथरी येथील सरपंचावर अतिक्रमणाची टांगती तलवार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
तालुक्यातील मौजा पाथरी येथील सरपंच पदावर आक्षेप घेत अतिक्रमणाची तक्रार वनविभाग व जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर केली असून सरपंच सौं अनिता ठीकरे यांचे पद धोक्यात येणार असल्याचे चित्र आहे.
सावली तालुक्यातील पाथरी नगरी इंग्रज कालीन मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालय इंग्रज कालीन आहेत, शिक्षण, आरोग्य व्यवस्था या ठिकाणी उत्तम असून मोठी बाजारपेठ आहे, व्यवहार करण्या साठी राष्ट्रीयकृत बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, जयकिसान बिगर शेती बँक आहे, आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी परिसरातील 30 ते 35 गावांचा रोज संपर्क येतो व मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ या ठिकाणी असते.
अशी ही पाथरी नगरी अनेक वर्षांपासून विकासाच्या दृष्टीने मागे पडली असल्याने मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नागरिकांनी अपेक्षा ठेऊन उमेदवारांना निवडून दिले व या ठिकाणी सर्वसाधारण महिला सरपंच पदाचे आरक्षण निघाले त्या मूळे निवडून आलेल्या महिला सदस्या पैकी सौं अनिता ताई ठीकरे यांना सरपंच पदावर विराजमान करण्यात आले पण त्यांची बस स्टॉप वर असलेली दुकान ही वनविभागाच्या अतिक्रमित जागेवर असल्याने त्यांच्या सरपंच पदावर अतिक्रमणधारक असल्याचा दावा पाथरी येथील नागरिकांने केलेला आहे तसेच अनेक दिवसा पासून शासनाने निर्माण केलेल्या झूनका भाकर केंद्राची इमारत सुद्धा मागील राजकीय नेत्यांनी बचत गटाला डावलून त्यांना भोगवटा तत्वावर दिल्याचे उघड झालेले आहे, त्या अनुषंगाने पाथरी येथील व्यक्तीने त्यांच्यावर अतिक्रमनाचा दावा करून वनविभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार दाखल केलेली आहे, आता सरपंच पद जाणार का ही उत्सुकता नागरिकांमध्ये आहे, तसे पाहिल्या गेल्यास या तीन वर्षात सरपंच सौं अनिता ठीकरे यांची कुठलीही दमदार कामगिरी नसल्याने हे पद गेलेच पाहिजे अशी चर्चा सुद्धा पाथरी येथील नागरिकांमध्ये आहे
मोका चौकशी करून इतर सबधित विभाग यांना नोटीस दिले आहेत त्यानंतरच माहिती होणार
विशाल धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी,सावली