ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रूपापेठ शाळेत साजरा झाला शाळा पूर्व तयारी मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रूपापेठ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दाखल पात्र विद्यार्थी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी लावण्यात आलेल्या सात स्टॉल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिक, बौद्धीक, सामाजिक, भावनिक विकास व भाषा विषयांच्या क्षमताची पडताळणी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ अवंतिका ताई उत्तम आत्राम या होत्या. प्रमुख पाहुणे रवी जुनघरे सदस्य ग्रामपंचायत, बापूजी किन्नाके प्रतिष्ठित नागरिक खडकी,उत्तम आत्राम, साळवे सर मुख्याध्यापक शाळा उमारहिरा हे होते.

या मेळाव्या साठी मोलाचे सहकार्य लाभले श्री तुमराम सर यांचे त्यांनी विध्यार्थी यांना मार्गदर्शन पण केले. तसेच अंगणवाडी सेविका सुनीता जुन्नरे, मंगलाताई मेश्राम यांचे सहकार्य लाभले. शाळा पूर्व तयारी मेळाव्यात शाळेचे विद्यार्थी, पालक, दाखल पात्र विद्यार्थी उपस्थित होते.. मुख्याध्यापक श्री आत्राम सर यांनी आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये