ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेड राजा मतदार संघात ५ वाजेपावेतो ५३.३१टक्के मतदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

बुलढाणा लोकसभा निवडणुक अंतर्गत सिंदखेड राजा मतदार संघात ३३६ मतदान केंद्रावर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.३१टक्के मतदान झाले. एकूण ३१४०७८ मतदारापैकी १६७४४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

महविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर, महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, अपक्ष उमेदवार रविकांत तूपकर व इतर उमेदवारांचे भाग्य सीलबंद झाले.त्रिकोणी लढतीत कोण बाजी मारणार हे निकालानंतर च कळणार आहे. तिन्ही उमेदवार आपणच विजयी होणार असा दावा करत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये