ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई,चे बल्लारपुर आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना श्रद्धांजली अर्पण

चांदा ब्लास्ट

दि.३० जानेवारी २०२४ राष्ट्रपिता म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांची ७६वी आज पुण्यतिथी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, महर्षि कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपुर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींनाजींच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण केले.

इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करणाऱ्या भारतातील एक शूर स्वातंत्र्यसैनिक मोहनदास करमचंद गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचे पालन केले. या मार्गाचा अवलंब करून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाले. म्हणून हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो. यासोबतच याला हुतात्मा दिन असेही म्हणतात. महात्मा गांधी यांना आठवत असताना आपल्या डोळ्यासमोर करो या मरो, मीठाचा सत्याग्रह, भारत छोडो, हे आंदोलन आठवतात. महात्मा गांधी यांनी आपल्या प्रत्येक भारतीयांच्या मनात अनेक बहुमुल्य विचार रुजवले आहेत. ते विचार म्हणजे अहिंसा, शांतता, सत्य.

या प्रसंगी एस. एन. डी. टी.महिला विद्यापीठ मुंबई, बल्लारपुर आवरचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींनाजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन केले तसेच समन्वयक वेदानंद अलमस्त आणि उपस्थित प्राध्यापक वृद प्रा. खुशबु जोसेफ,प्रा. अश्विनी वाणी, प्रा. नेहा गिरडकर, प्रा. शित‌ल बिल्लोरे, प्रा. श्रृतिका राऊत, प्रा. सलोनी परिमल आणि ममता भेंडे, वैशाली बोमकंटीवार, स्नेहा लोहे उपस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधींनाजी यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये