भावी पोलीस बनण्याचे स्वप्न भंगले ; नदी पात्रात उतरणे बेतले जीवावर
दोन विद्यार्थ्यांचा भोयगाव नदी पात्रात बुडून मृत्यू ; भोयगाव नदी पात्रातील घटना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा भोयगाव मार्गावरील वर्धा नदीत तीन जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे यात दोन तरुणी एक तरुणाचा समावेश आहे यातील एका मुलीला वाचविण्यात यश आले असून दोन जणांचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहेत. सदर घटना धानोरा भोयगाव मार्गांवरील नदीच्या पत्रात आज सकाळी घडली असून संध्या शिंदे वय २० वर्ष रा. जिवती, युगल नागापुरे वय १९ वर्ष रा.सोनापूर गोंडपिपरी असे मृत्तकांची नावे असून समीक्षा शेंडे वय २० वर्ष बाबुपेठ चंद्रपूर या तरुणीला पाण्यात बुडाली असता वाचविण्यात यश आले आहेत
सविस्तर वृत्त असे की ग्रामीण भागासह शहरी भागात पोलीस भरतीसाठी विद्यार्थी तसेच तरुण तरुणी मेहनत घेत सकाळी रनिंग व्यायाम करताना दिसत आहेत अश्याच आदर्श फिजिकल ग्रुप चंद्रपूरचे संचालक आदर्श चिवंडे यांनी आपल्या एकूण ३६ विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी धानोरा भोयगाव मार्गांवरील वर्धा नदीवर आणले होते व्यायाम झाल्यानतर काही मूल मुली नदीच्या पाण्यात उतरले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन मुली नदीच्या पात्रात बुडाल्या त्यातल्या एका तरुणाने मुलीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तो ही पाण्यात बुडाला तर आणखी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने एका मुलीला वाचविण्यात यश आले तर एका मुलीचा मृतदेह पाण्यातुन बाहेर काढण्यात आला तर वाचविण्यासाठी उडी मारलेल्या मुलाचा मृत्तदेह अजूनही पाण्यात बुडून असल्याची माहिती आहेत
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घुघूस व गडचांदूर पोलिसांनी धाव घेतली असून त्या बुडून असलेल्या युगल नागापुरे या तरुणाचा शोध सुरु असून अधिक तपास घुग्घूस पोलीस करीत असल्याची माहिती आहेत.