Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

दोन मोटारसायकलच्या धडकेत एक ठार दोन जखमी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आंभोरा फाटा, उंबरखेड रोड येथे दोन मोटारसायकल ची समोरासमोर धडक होऊन एक इसम ठार झाला तर दोघे जखमी झाल्याची घटना 8 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घडली, पोलिसांनी आरोपी मोटारसायकल चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की  फिर्यादी मंगला दगडुबा चिंचोले रा निमगाव वायाळ व त्यांचे पती मोटारसायकल क्रमांक MH-28-M-7733 फॅशन प्लस ने उंबरखेड कडुन देउळगावराजाकडे जात असतांना अंभोरा फाट्यावर समोरून देउळगाव राजाकडुन येणारी मोटारसायकल क्रमांक MH-28-BY-0127 प्लॅटीना चां चालक नामे सिदधार्थ अशोक खंडाळे रा. उंबरखेड याने त्याच्या ताब्यातील मोटासायकल ही भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन फि चे पतीचे मोटारसायकलला धडक मारली त्यात दगडुबा मनिराम चिंचोले वय 60 वर्ष रा. निमगाव वायाळ यांचा मृत्यू झाला, व पत्नी व मुलगी जखमी झाली.

अपघाताची तक्रार पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी मोटासायकल चालक सिद्धार्थ अशोक खंडाळे रा उंबरखेड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये