“स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकातर्फे मोहा दारूची निर्मिती करणाऱ्या गुन्हेगारावर धडक कारवाई.”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा पोलीस अधीक्षक मा.श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील गावठी दारू निर्मीती करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने गावठी दारू निर्मीती करणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची धडक मोहिम राबविली असुन, सदर मोहिमेदरम्यान दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रोजी पोलीस स्टेशन सेलू हद्दीतील बोर नदीचे पात्रात गावठी मोहा दारूच्या निर्मीती करीता कच्चा मोहा सडवा रसायन तयार करणाऱ्या आरोपीवर कारवाई करीत 1,600 ली. मोहा सडवा रसायण, ड्रम सह जु.कि. 3,32,200 रू चा मुद्देमाल जप्त करून, जागीच नाश करण्यात आला असुन, आरोपी नामे केशव पचारे रा. सेलु याचेविरूध्द पोलीस स्टेशन सेलू येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.अं. अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, सागर भोसले सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



