चांदा पब्लिक स्कूल येथे झळकले चिमुकले मास्टरशेफ

चांदा ब्लास्ट
पाककला ही चविष्ट, रूचकर व पोषक जेवन बनविण्याची कला होय. आजकाल स्त्री, पुरूष दोघेही पाककलेमध्ये आपली रूची दाखवितात. या कलेत आई वडिलांसोबत सहभागी होताना मुलांमधील एकत्रितपणा व सहकार्य या गुणांना वाव मिळतो. सर्वांगिण विकासामधिल ‘स्वावलंबन‘ या महत्तपूर्ण गुणाचा विकास विद्यार्थ्यांमध्ये व्हावा हा उद्देश लक्षात घेता चांदा पब्लिक स्कूल येथील पुर्व प्राथमिक विभागात लिटिल मास्टरशेफ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित परिक्षक सौ. किर्ती दिनेश देशपांडे, डॉ. उषा खंडाले व डॉ. प्रज्ञा जुनघरे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली.
मुलाच्या प्रत्येक आनंदात यशात आणि छोट्या छोट्या प्रयत्नात आईचे संस्कार आणि परिश्रमाची प्रचिती आपल्याला येते. आई आणि मुलाचे हे नाते अधिक घट्ट व्हावे व त्यांच्यातील तालमेल अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना प्रस्तुत करता यावा यासाठी शिक्षकांनी नर्सरी चिमुकल्यांचे आईसोबत (“फायरलेस कुकिंग“) लिटिल मास्टरशेफ स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात पालकांचा उत्साह पाहायला मिळाला तर याच स्पर्धेत एल.के.जी. व यु.के.जी. विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांसोबत सहभागी व्हायचे होते. सर्व क्षेत्रात स्त्रियांनी स्वतःला सिद्ध केले आहे. तर पुरूष मंडळी पाककलेमध्ये कसे मागे राहतील. हे दाखविण्यासाठी सुंदर अश्या नाविण्यपूर्ण स्वादिष्ट पक्वान बनवत पालकांनी आपल्या पाल्यासोबत आपली पाककला सादर केली.
परीक्षक सुद्धा नवनवीन पक्वान व त्यांचे सादरीकरण पाहून भारावून गेले होते. शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी पालकांचा उत्साह वाढवत असे वक्तव्य केले की, जे पालक अश्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या पाल्यांना वेळ देतात ते एक उत्तम चारित्राची जडण-घडण करीत आहे हे निश्चितच.
शाळेच्या मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे यांनी मुलांचा उत्साह वाढवत त्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करण्या-या पालकांचे कौतुक केले.
ही स्पर्धा पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका अल्फा बोरम व शिक्षिका मनिषा नागोशे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रभारी ममता मिन्नरवार यांनी केले.



