गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारु विक्रेत्यामध्ये एम.पि.डी.ए. कायदयाची प्रचंड दहशत सन २०२४ मध्ये एकुण ६ गुन्हेगार स्थानबध्द

पोलीस स्टेशन आर्वी हद्दीतील अवैध दारु विक्रेत्या विरुध्द एमपिडीए कायदयांतर्गत कारागृहात स्थानबध्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन आर्वी, अंतर्गत नेरी पुर्नवसन परिसरात अवैध दारु विक्री करणारा मोरेश्वर सुधाकर निघोट, वय ३८ वर्षे, रा. नेरी पुर्नवसन आर्वी जि. वर्धा याचेविरुध्द पोलीस स्टेशन आर्वी, जि. वर्धा येथे सन २०२० ते २०२४ पावेतो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ तसेच शरीराविरुध्द २ असे एकुण २४ गुन्हे दाखल आहेत. स्थानबध्द ईसमाविरुध्द वेळोवेळी प्रचलीत कायदयान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती.

परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सदरहु स्थानबध्द हा न जुमानता अवैधरीत्या गावठी मोहा दारु, देशी विदेशी ची आवीं शहरामध्ये विक्री करण्याकरीता तस्करी करीत होता. ज्यामुळे आवीं परिसरातील सार्वजनीक स्वास्थास धोका निर्माण होवुन सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था बाधीत झाली होती. तसेच पोलीस स्टेशन आर्वी परिक्षेत्रातील नेरी पुर्नवसन परिसरातील मोठया प्रमाणात मद्दपी लोकांचा जनसामान्यांना तसेच महीला मुलींना खुप त्रास वाढत चालला होता.

त्याभागातील अनेक शांतता प्रिय सामान्य नागरीकांच्या स्थानबध्द मोरेश्वर निघोट विरुध्द अनेक तक्रारी प्राप्त होत्या. ठाणे प्रभारी अधिकारी पोनी/यशवंती सोलसे, यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना सादर केला होता. त्याअनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांनी दिनांक ०८ एप्रिल २०२४ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले होते.

आगामी लोकसभा सार्वत्रीक निवडणुका २०२४ हया लक्षात घेता लोकसभा निवडणुका निर्भीड, प्रलोभन मुक्त व शांतता पूर्ण वातावरणात पार पाडण्याचे उददेशाने अशा अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर एमपिडीए कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा.जिल्हादंडाधिकारी, वर्धा तसेच मा. पोलीस अधिक्षक वर्धा यांनी दिलेले आहेत. सन २०२४ साली आज पावेतो ६ गुन्हेगारावर एम.पि.डी.ए. कायदयांर्तगत अश्याच प्रकारची कठोर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हयातील अवैध दारु विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशती मध्ये आहे.

सदर प्रकरणी मा. नुरुल हसन, पोलीस अधिक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनात पोनी यशवंत सोलसे, पोलीस निरीक्षक, पोस्टे आर्वी, पोनी/संजय गायकवाड, सफौ संजय खल्लारकर, गिरीष कोरडे, पोहवा/अमोल आत्राम, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलीस अंमलदार/विनोद मस्के, दिगांबर रुईकर पोस्टे आर्वी यांचे पथकाने यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये