ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हत्तीरोग निर्मूलनाची प्रभावी अंमलबजावणी करा – सीईओ विवेक जॉन्सन

10 तालुक्यात हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम

चांदा ब्लास्ट

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10 ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर मोहीम जिल्ह्यातील 10 तालुक्यात राबविण्याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून सदर अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.जिल्हा परिषदेतील जनपद सभागृहात जिल्हा समन्वय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी पुढे सांगितले की  हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी जिल्ह्याचा मास्टर प्लॅन तयार करावा. हत्तीरोगाचे रुग्ण अधिक आहे अशी तालुके व बाधित गावांची यादी तयार करावी. सार्वत्रिक औषधोपचार मोहीम प्रभावीपणे राबविणे, हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत लोकसहभाग वाढविणे, तसेच मोहिमेपूर्वी तालुकास्तरावर तालुका समन्वय समितीमार्फत बैठक घेणे तसेच सदर मोहिमेची व्यापक जनजागृती करून मोहीम 100 टक्के यशस्वी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बैठकीत संबंधित यंत्रणांना दिल्या.

क्युलेक्स नावाचा डास चावल्याने हा आजार होते. चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे उत्पादन जास्त असलेल्या तालुक्यांमध्ये हत्तीरोगाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येतात. सदर मोहीम  जिल्ह्यातील चंद्रपूर ग्रामीण, भद्रावती, राजुरा, पोभुर्णा, गोंडपिपरी, मुल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व चिमुर या तालुक्यात राबविण्यात येणार आहे.सदर मोहिमेदरम्यान नागरिकांनी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दिलेल्या गोळ्या त्यांच्यासमोरच खाव्यात व ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये