ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त

मांगली गावाजवळ महसूल विभागाची आणखी एक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      सध्या भद्रावती महसूल विभागाद्वारे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रेती तस्करीच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याने रेती तस्करांचे धाबे चांगले दणाणले आहे.

महसूल विभागाद्वारे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करीत सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. सदर कारवाई महसूल विभागाद्वारे दिनांक शुक्रवारला रात्रो साडेनऊ वाजता तालुक्यातील मांगली गावाजवळ करण्यात आली. नंबर नसलेल्या व ट्रॉली क्रमांक एम एच 34 bp 58 66 या ट्रॅक्टर द्वारे रात्रीच्या वेळेस एक ब्रास रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आल्याने सदर कारवाई करण्यात आली.

सदर ट्रॅक्टर सुरज चौधरी, राहणार मांगली यांच्या मालकीचा आहे. सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी अनिल दडमल, ग्राम महसूल अधिकारी राहुल भोंगळे, संदीप मुरकुटे, गोविंदा सेलोटे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये