ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवडणूक व होळी सणाचे निमित्याने चोख बंदोबस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

चिमूर -गडचिरोली लोकसभा निवडणूक आचार संहिता सुरु झाल्याने प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत कोणतेही वाहन आचार साहितेचा भंग होणार नाही आणि अवैध धंदे आणि दारू पिऊन वाहन चालविणारे यांचेवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत यामुळे होळीचे सणावर थोडी नाराजी दिसून येत आहे.

होळीचा सण आणि आचार संहिता यामुळे अनेक बंधने आली असल्याने सणाचे निमित्याने काही नियम असल्याने कायाद्याचे कचाट्यात सापडण्यापेक्षा आचार संहिताचे पालन करून होळी सण साजरा करावा असे पोलिस विभागाने सूचित केले आहेत.

याचे जनतेने सहकार्य करावे आणि होळी सण साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी याकरिता चोख बंदोबस्तही लावला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये