ताज्या घडामोडी

अखेर प्रतिभा ठरली वरचढ – काँग्रेसच्या विशेष यादीत धानोरकरांना पसंती

पक्षांतर्गत लढाई जिंकली पण निर्णायक विजय कुणाकडे झुकणार?

  • चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

काँग्रेस पक्षाने अखेरीस आपली तीन उमेदवारांची छोटेखानी यादी जाहीर केली असुन ह्या यादीत राजस्थान मधिल दोन तर महाराष्ट्रातील एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली असुन 2019 साली जायंट किलर ठरलेल्या महाराष्ट्रातील पक्षाच्या एकमेव खासदाराच्या पत्नीला चंद्रपूर वणी आर्णी मतदार संघाची उमेदवारी बहाल केली असुन स्व. सुरेश उर्फ बाळू धानोरकर ह्यांच्या पत्नी तथा वरोरा विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर ह्यांना पक्षाने लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी अधिकृत केले आहे.

राज्यात प्रचंड रस्सीखेच असलेला एकमेव लोकसभा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्र. मागील निवडणुकीत ऐनवेळी शिवसेना सोडुन काँग्रेस पक्षात प्रवेश करून केवळ बारा दिवसांच्या प्रचाराच्या बळावर तत्कालीन केंद्रिय गृहराज्यमंत्री तथा ह्या क्षेत्राचे सतत तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे हंसराज अहिर ह्यांना चितपट करून राज्यात पक्षाचे एकमेव खासदार बनले. त्यांच्या निधनानंतर आ. प्रतिभा धानोरकर ह्यांनी चंद्रपूरच्या जागेवर आपला नैसर्गिक हक्क असल्याचा दावा करून पक्षाच्या उमेदवारीसाठी कंबर कसली.

राज्यात पुन्हा एकदा जिंकण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाच्या परंपरेनुसार उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली. ह्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ह्यांनी पडद्यामागून सुत्रे हलवुन चक्क आपली मुलगी शिवानी हिला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली. वडीलांच्या पुण्याईवर युवा नेत्याचा शिक्का घेऊन शिवानी वडेट्टीवार ने थेट दिल्ली गाठून चुरस निर्माण केली. पक्षात कोणत्याही कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार असल्याचे सांगुन त्याचप्रमाणे स्व. बाळू धानोरकर ह्यांना तिकीट व विजय मिळवुन देण्यात आपला सिंहाचा वाटा असल्याचे सांगुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ह्यांनी आपल्या लेकीची दावेदारी पुढे दामटली.

प्रतिभा विरुद्ध शिवानी व विजय वडेट्टीवार ह्यांचा संघर्ष थेट दिल्लीत पोहचला, तिथेही वेळेत मतैक्य न झाल्याने राज्यातील उमेदवारांच्या पहिल्या यादीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात पक्ष यशस्वी ठरला नव्हता. दरम्यान प्रतिभा धानोरकर ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार ह्यांचेकडे उमेदवारीसाठी मध्यस्ती करण्याचे साकडे घातले.

अखेरीस काँग्रेस पक्षाने चंद्रपूर लोकसभेसाठी उमेदवारी घोषित केले असुन प्रतिभा धानोरकर विजय वडेट्टीवार ह्यांच्यावर वरचढ ठरल्या असुन त्यांनी आपल्या हिकमातीवर पक्षाची उमेदवारी खेचुन आणली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये