ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयपीएल २०२४ च्या हंगामासाठी सट्टा एजंट गाव खेड्यात झाले सक्रिय

डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये बुकी मालामाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

क्रिकेट आणि त्यावर खेळला जाणारा जुगार हा प्रकार नवा नाही. क्रिकेट वर सट्टा आता महानगरातून गावखेड्यात पोहचला आहे. हातात स्मार्ट फोन आल्याने दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेत सट्टा खेळण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अनेक परिवाराला याची झळ सोसावी लागत आहे. बुकींमुळे डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये अनेक शालेय विद्यार्थी या जुगाराचा शिकार झाल्याचे कळते. परिणामतः याचा नाहक त्रास पालकांना सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

       अधिक माहितीनुसार कळत की, वरोरा तालुक्यात कित्येक वर्षापासून ठराविक लोक या जुगाराचा उपयोग करून अवैध व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे अनेक खेडेगावात, गावातील ठराविक पान ठेल्यावर, मोबाईलवर क्रिकेटचा सट्टा खेळल्या जात आहे. क्रिकेट सट्ट्याला ऑनलाईन खेळण्यास व यामध्ये वृद्धी होण्याचे कारण की, हे सहजतेने उपलब्ध आहे आणि खेळण्यासाठी मोठ्या धनराशीची आवश्यकता नसते.

सट्टा लावणाऱ्याला फक्त आपल्या स्मार्टफोन, कॉम्प्युटर अथवा टॅबलेटच्या माध्यमातून वेबसाईटवर जाऊन आपले खाते उघडावे लागते त्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड मिळतो. आणि मग मोबाईलच्या या अप्लिकेशन वर युवक दिवस रात्र क्रिकेटवर व तीन पत्ती, अशी अनेक प्रकारचे जुगार या माध्यमातून खेळताना नजरेस पडतात. अनेक वेबसाईट पैकी Purple 9 ही एक वेबसाईट असल्याचे कळते. मात्र या वेबसाईट वर अजून पर्यंत संबंधित प्रशासनाचे लक्ष गेले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे यामाध्यमातून अनेक बुकी मालामाल झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे या खेळात बर्बाद झाल्याने विद्यार्थी, तरुण एकतर आत्महत्या किंवा गुन्हेगारी वळल्या जाण्याची भीती नाकारता येत नाही.

       आयपीएल क्रिकेट हंगाम २०२४ साठी क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा घेण्यासाठी तालुक्यात व शहरात अनेक ठिकाणी या अवैध व्यवसायाचे एजंट नेमले गेले असून या माध्यमातून लाखो रुपयांचा अवैध व्यवसाय होण्याची शक्यता बघता संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तालुक्यातील शहरातील ठराविक जुगार चालवणाऱ्या बुकींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये