ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जंगल संवर्धन आपले कर्तव्य समजावे – कर्नल थापा

जागतिक वन दिना'निमित्त वृक्षारोपण व कार्यशाळेचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 पर्यावरणाच्या संवर्धनात जंगलाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जंगल वाचले तरच आपण पण वाचणार. म्हणून महाविद्यालयीन तरूण तरूणींनी जनजागृती करणे आवश्यक आहे. जंगलाचे संवर्धन आपले कर्तव्य समजावे, असे प्रतिपादन स्थानिक 21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल नवनित थापा यांनी जागतिक वन दिना’निमित्त आयोजित वृक्षारोपण व निसर्ग अभ्यास कार्यशाळेत 21 मार्च रोजी छात्र सैनिकांना मार्गदर्शन करताना स्थानिक निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सिजन पार्क येथे केले.

एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी.युनिट, राष्ट्रीय हरित सेना पथक, राष्ट्रीय सेवा योजना पथक व रोव्हर-रेंजर युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग अभ्यास कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे तर प्रमुख अतिथी म्हणून एन.सी.सी.चे प्रशासकीय अधिकारी कर्नल नवनित थापा, वन परिक्षेत्र अधिकारी रितेश भोगांडे,

एन.सी.सी. अधिकारी तथा राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर, स्काऊटचे जिल्हा संघटक नितेश झाडे, प्रा. मेघा फासगे व वैशाली गुजरकर उपस्थित होत्या.

कार्यशाळेची सुरवात मान्यवरांच्या उपस्थितीत स्वयंसेवकांनी 10 वृक्षरोप लावून केली. वनाचे महत्व या विषयावर वन परिक्षेत्र अधिकारी रितेश भोगांडे यांनी आपले अनुभव कथाकथन केले तर मुरलीधर बेलखोडे यांनी ऑक्सिजन पार्कची यशोगाथा विशद केली.

संचालन कॅडेट कोमल शितळे व आकाश कन्नाके यांनी तर आभार रितेश बुटे याने मानले. यशस्वीतेकरीता राष्ट्रीय हरित सेनेच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये