ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जीवन वाचविण्यासाठी रक्तदानाची भूमिका महत्त्वाची – विरेंद्र सिंग

सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

वरोरा : रक्तदान चळवळीत रक्तदाता हाच महत्त्वाचा घटक आहे. गरजू व्यक्तीचे जीवन वाचविण्यासाठी रक्तदान महत्वाची भूमिका बजावते. मानसाला मानसाचे रक्त लागते म्हणून रक्तदाता हा वर्तमानात व भविष्यातही तितकाच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नागपूर मंडळाचे अध्यक्ष विरेंद्र सिंग यांनी येथे केले. सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, वरोरा शाखाचे सचिव बि.के. भुयान याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संघाच्या वरोरा शाखेच्या वतीने येथील रेल्वे हॉस्पिटल परिसरात आयोजित रक्तदान शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

    कार्यक्रमात सेंट्रल रेल्वे मजदूर संघ नागपूरचे मंडळ सचिव राकेश कुमार, पदाधिकारी संग्रामसिंग, सहायक मंडळ अभियंता रमेश प्रसाद, वरोरा रेल्वे हॉस्पिटलचे डीएमओ डॉ. एम. धनराज, नागपूर येथील जीवन ज्योती रक्तपेढीचे व्यवस्थापक डॉ. आशीष चौधरी, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, शाखा वरोरा अध्यक्ष राकेश कुमार, सचिव बि.के भुयान प्रामुख्याने उपस्थित होते.

        सिंग पुढे म्हणाले की, ‘रक्तदान, महादान’ आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे कुणाचाही जीव जाणार नाही, याच उदात्त हेतूने आयोजित रक्तदान शिबीर या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची भूमिकाही विशद केली.

       राकेश कुमार यांनी आपल्या मनोगतात रक्तदानाचे महत्व सांगितले.

        डॉ. धनराज म्हणाले की, रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी होतो. स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढाकार घेऊन शिबिरात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी रक्तदात्यांची प्रशंसा केली.

           भुयान यांनी आपल्या मनोगतात रक्तदान व संघटनेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. वाढदिवसानिमित्त स्वेच्छेने रक्तदान केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

    रक्तदान शिबिरात१०२ जणांनी रक्तदान केले.

        कार्यक्रमाच्या सुरुवातीला म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे संस्थापक एस.एम.शुक्ला यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून द्वीप प्रज्वलन केले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांचे स्वागत पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. याप्रसंगी बि.के भुयान यांचा ५७ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

   शिबिराच्या यशस्वितेसाठी संघटनेचे वरोरा अध्यक्ष राकेश कुमार, पदाधिकारी विनोद कुमार, आशिष हरणे, पीयुष अंबुलकर, नरेश बारीक, सचिन राजूरकर, सचिन ताजने, भंवरलाल मीना, आनंद येटे, जितेंद्र पीटर, मालती सेलुकर, यादगिरी राधाकृष्णन, दिनेश आगलावे, गजानन गोंडे, राकेश देउळकर, रविप्रकाश सुमन, संजय मगरे, मनोज धांडे, विवेक झाडे, सचिन पिंपळकर जीवन ज्योती रक्तपेढीचे किशोर खोब्रागडे, मोनाली राऊत, लोकेश देशमुख आदींनी योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये