ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकणकर यांच्या विषयी आक्षेपाहर्य विधानाचा निषेध

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा अशोक डोईफोडे

 महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या विषयी समाज माध्यमात आक्षेपाह्य पोस्ट व्हायरल करणाऱ्यांचा महिला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात समाजातील मानसिक विकृत आरोपी व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

 तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर ह्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जिजाऊ सावित्रीआई अहिल्याबाई यांच्या विचाररांना पुढे नेण्याचे काम करीत आहे. रूपालीताई यांच्या बद्दल समाजातील काही विकृत कृतीच्या लोकांनी आक्षेपार्य पोस्ट केली. या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सुनीता सवडे, तालुकाध्यक्ष मंदाताई शिंगणे, शहराध्यक्ष रेखाताई पवार, सरस्वती टेकाळे,रेणुका बुरकुल,रीतताई जिंतुरकर,अल्मास निदा कोटकर,दीपमाला गोंमधरे, इशाना सय्यद युसुफ,आयशा कयूम खान, नबीला फातिमा,हुमा परवीन, अरविंद खांडेभराड, काशीफ कोटकर, निलेश गीते,के पी खांडेभराड,विशाल पवार,बलवंतसिंग बावरे,शांतनु भाग्यवंत आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये