ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाखर्डी येथे लोकसहभागातून उभारणार ऑक्सीजन पार्क

अंबुजा फाउंडेशन व गुरुदेव सेवा मंडळाचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

बाखर्डी येथे स्मशानभूमीत येथील दोन एकर परिसरामध्ये अंबुजा फाउंडेशन, गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामपंचायतच्या सहकार्याने लोकसहभागातून ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली. ३५० झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. या झाडामध्ये फळ झाडे, फुलांची झाडे, वटवृक्ष लावण्यात आली.

           या पार्कचे उद्धाटन स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच अरुण रागीट तर प्रमुख उपस्थिती निलेश ताजने, ऍड. दीपक चटप, अंबुजा फाउंडेशनचे दीपक साळवे, गुरुदेव सेवा मंडळचे डॉ.अरविंद ठाकरे, डॉ. हर्षांनंद हिरादेवे, शैलेश लोखंडे, गोहोकार महाराज, माजी पं. स. सदस्य नूतमकुमार जीवने, उपसरपंच वैशाली गाणफाडे, हरिदास जेणेकर, ग्रा. पं सदस्य सुभाष ताजने, प्रकाश खुसपुरे, वामन कुळमेथे, अमृता बुचुंडे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक डांगे, गुरुदेव सेवा मंडळचे अध्यक्ष गोसाई बांदूरकर, किशोर विधाते, माजी सरपंच तानेबाई भोयर उपस्थित होते.

                 उद्घाटन मार्गदर्शनात प्रा. आशिष देरकर यांनी सांगितले की, राजकारण फक्त निवडणुकीसाठी असले पाहिजे निवडणूक झाल्यावर मतभेद विसरून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. तरच गावाचा विकास होतो. अन्यथा गावाचा विकास खुंटतो. ऍड. दीपक चटप यांनी गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणामुळेच मी विदेशात जाऊन शकलो. यावेळी शैलेश लोखंडे, नूतनकुमार जीवने, अंबुजाचे साळवे, डॉ. हिरादेवे यांनी मार्गदर्शन केले.

             डॉ. हर्षांनंद हिरादेवे यांनी आक्सिजन पार्क व गावातील वृक्षारोपण रोपणसाठी १ लाख रुपये मदत जाहीर केली.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश तावीडे यांनी केले. त्यांनी प्रस्ताविकातून लोकसहभागावर प्रकाश टाकला. सुत्रसंचालन गुरुदेव सेवा मंडळचे सचिव मोरेश्वर बावणे यांनी तर आभार नितीन बांदूरकर यांनी केले.

         आक्सिजन पार्क निर्मिती करण्यासाठी गुरुदेव सेवा मंडळचे प्रचारक रामदास ताविडे महाराज, ग्रा.पं सदस्य सुभाष ताजने, मोरेश्वर बावणे,मारोती पानघाटे, रामदास पाचभाई, अंकित पायपरे, मंगेश उलमाले यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेतल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये