ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक शाळा येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न 

चांदा ब्लास्ट

नुकतेच यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक शाळा भंगाराम वॉर्ड भद्रावती येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला

या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदना गैनवार सामाजिक कार्यकर्ती सर्व प्रथम माता जिजाऊ ; सावित्री बाई फुले ; रमाबाई आंबेडकर यांच्या  प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले

प्रमुख पाहुणे म्हणून राजू गैनवार माजी नगरसेवक ; रवी मडावी मुख्याध्यापक ; सुषमा झांझोटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष भाषण करताना वंदना गैनवार म्हणाल्या की महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिंन म्हणून साजरा करण्यात येतो दिनाक १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचणे नुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दीन म्हणून निश्चित करण्यात आला

पहिलीच्या काळात मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती परंतु सावित्री बाई फुले यांनी महिलांना शिक्षण दिले आज महिला यशोगती पथावर आहेत असे म्हणाले

या मध्ये संगीत खुर्ची ; बास्केट बॉल ; टिकली स्पर्धा ; गोंडी नृत्य इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले प्रास्ताविक पापिता विश्वास यांनी केले व सूत्र संचालन दीपा झांझोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश घोरुडे यांनी केले

कार्यक्रम यशस्वी करणे करिता छगन पराते व विद्यार्थिनी ; विद्यार्थी शिक्षक गण यांनी अथक परिश्रम घेतले

या कार्यक्रमाला पालक व वॉर्ड वासी उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये