ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवाशक्ती विचार मंच, वरोरा व लोकमान्य महाविद्यालय, वरोरा (राष्ट्रीय सेवा योजना) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट

वरोरा (वा.) :- युवाशक्ती विचार मंच, वरोरा व लोकमान्य महाविद्यालय ( राष्ट्रीय सेवा योजना ) आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 मार्च 2024 रोज शनिवारला रक्तदान शिबिराचे आयोजन लोकमान्य महाविद्यालयात करण्यात आले.

                 या शिबिराच्या सुरुवातीला छोटेखानी उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व यावेळी 58 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला युवाशक्ती विचार मंच, वरोरा व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. या शिबिरात प्रत्येक रक्तदात्याला युवाशक्ती विचार मंचातर्फे रक्तदान केल्याबद्दल सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

                 या कार्यक्रमाला युवाशक्ती विचार मंचच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व लोकमान्य महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, रा.स.योजनेचे स्वयंसेवक, आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूरचे श्री इंगळे सर व कर्मचारी, इत्यादींची मदत मिळाली.

व या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता गणेश नक्षिणे, शकिल शेख, लोकेश रुयारकर, रोहीत घाटे, सौरभ साखरकर, लोकेश घाटे, समर्थ कुमरे, प्रा.जयश्री शास्त्री मॅडम, प्रा. तानाजी माने सर, प्रा.डॉ. शेंडे सर , युवाशक्ती विचार मंच व लोकमान्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये